बुथ विजय अभियान कार्यक्रम संपन्न
दापका (एल.पी.उगीले) : दापका येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संभाव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊन बुध विजय अभियान राबवण्यात आले. या बूथ विजय अभियानाचे उद्घाटन कैबिनेट मंत्री ना. प्रभु चौव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. बुथ विजय अभियान अंतर्गत कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री प्रभू बी चव्हाण यांच्या हस्ते प्रथम गोमातेचे पूजन करण्यात आले, नंतर भवानी मातेचे दर्शन आणि आरती करण्यात आली.
बुध अध्यक्ष यांच्या घरी मलिकार्जुन यांच्या घरावर ध्वज लावण्यात आले, नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आले. त्यानंतर बुथ नंबर दोनचे अध्यक्ष दीपक धनाजी जाधव यांचा सन्मान करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यात आला. बूथ नंबर तीन अध्यक्ष राम पाटील यांचा सन्मान व झेंडा लावून करण्यात आला. बुथ नंबर चार अध्यक्ष वसंत शिंदे यांच्या घरावर झेंडा लाऊन, सन्मान करण्यात आला. गावातील काही रुग्णांना भेट दिली व काही रुग्णांना मदत करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले, कर्नाटक राज्याचे कॅबेट मंत्री ना. प्रभू बी चव्हाण यांचा मैसूर फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर रामशेट्टी पन्हाळे व शिवाजीराव काळे, शिवाजीराव पाटील, किरण पाटील अशा विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय मुर्के यांनी केली. व बीजेपी तालुकाध्यक्ष राम शेट्टी पन्हाळे यांनी बूथ प्रमुख, पेज प्रमुख स्तरातून देशाची सेवा करण्याची विविध रूपातून सखोल असे मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टीतील सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार सुद्धा होऊ शकतो, फक्त त्याच्या कार्यातून पक्षात विचार केला जातो. बुथ अध्यक्ष सुद्धा आमदार बनू शकतो, असे विविध उदाहरणे देऊन सांगण्यात आले . त्या नंतर कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. प्रभू बी चव्हाण यांनी मी माझा मोठेपणा सांगत नाही, मी एक जनतेचा सेवक आहे. सेवक म्हणूनच राहणार.
कुठलाही विकास करण्यासाठी भौतिक सुविधाची नितांत गरज असते. त्यासाठी गेल्या 14 वर्षांत आपण औराद तालुक्यासाठी सर्वप्रथम रस्त्याची जाळ पसरले आणि नंबर एकचे रस्ते करून घेतले. दोन नंबरला लाईट बऱ्याच भागात पोहोचले नव्हती, लाईटची पण सुविधा केलेली आहे. तीन नंबरला या भागातील जलसाठा आणि नॅशनल हायवे अशा काही दळणळण वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या आपल्या गत 14 वर्षात पूर्ण करून घेतलेला आहे.
आता यानंतर आमच्या भागामध्ये कारखाने, छोटे-मोठे उद्योग अशा विविध रूपातून औराद तालुक्याचा झपाट्याने विकास करण्याचं आमचं स्वप्न आहे. ते स्वप्न सुद्धा मी साकार करेन, बेंगलोर राजधानी मध्ये औराद तालुक्याची वेगळी ओळख व्हावी, हा माझा संकल्प आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातील विकासाचा आराखडा पूर्ण करण्याचा आपला संकल्प आहे. तो संकल्प आपण पूर्ण करणार आणि मी तुमचा आहे. आणि तुमच्या सुखात, दुखात मी सतत सामील होणारा आमदार आहे. माझी ओळख, माझा परिसर, माझा तालुका आणि माझं काम हीच आहे. मी कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे मतदारसंघाला विकास कामासाठी हजार कोटीची कामे मिळालेली आहेत, मांजरा नदीचे पाणी लिफ्ट इरिगेशन करून औरादला पाणी आणण्याचं संकल्प पूर्ण झालेला आहे. औरादला सी पी एड कॉलेज आणलेले आहे. प्रत्येक गावोगावी “हर घर जल जीवन मिशन” मी अस्तित्वात आणून प्रत्येक गावाला कोटी, दोन कोटी, तीन कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.
त्यासाठी मला आणखी एक वेळेस आपण आशीर्वाद द्याल, ही अपेक्षा ठेवून, पार्टी अंतर्गत असलेले मतभेद बाजूला सारून सर्व कार्यकर्ते एक समान आहेत असे समजतो. त्यांच्यात कसलाही भेदभाव करत नाही.
प्रत्येक मतदार माझा कार्यकर्ता समजतो, मी विरोधक कोणाला समजत समजत नाही. अशा विविध उदाहरणातून दापका परिसरात विकास कामे करून या भागाचा कायापालट केला आहे. भारतीय जनता पार्टीची आपल्या परिसरातून मोठी एकजुटी दिसत आहे, चप्पा चप्पा भाजपा ही मिशन दापका परिसरातील कार्यकर्त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि दाखवणारच, अशी खात्री कार्यकर्त्यांनी सुद्धा मंत्री महोदयांना दिलेली आहे. त्यावेळी भारतीय जनता पार्टीची तालुका, जिल्हास्तरातून विविध कार्यकर्ते आलेले होते. राम शेट्टी पन्हाळे , शिवाजी पाटील ,शिवाजीराव काळे , वसंत बिरादार, अशोक हांनमडगे, प्रशांत रेड्डी, पंडीत पाटील, विलास गूरूजी, सुरेश पाटील, योगेश पाटील, रमेश पाटील, संदीप औरादे, बालाजी नाईक, उमेश नाईक,हाणम नाईक, राजू शेळके,अंकुश वाडीकर, शुभम पाटील, सुनिल पाटील, दापका महाशक्ती केंद्रातील आठ शक्ती केंद्र प्रमुख व आडोतीस बुथ अध्यक्ष हजर होते. भारतीय जनता पार्टीचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा प्रतिसाद दिसून आला.
