आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनीअर कॉलेज ,देवणी येथे माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात जिजाऊ जयंती साजरी केली. आदर्श माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून स्कुलच्या प्राचार्या सुप्रिया कांबळे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार भोजने, प्रशांत घोल्पे, वैष्णवी बिरादार यांचा सहभाग लाभला. प्रियंका मंटोळे यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ यांचा जीवन प्रवास सांगितला. तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहात सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी चारोळ्या, पोवाडे व भाषण इत्यादींचे सादरीकरण केले.

जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष शिक्षण महर्षी गोविंदरावजी भोपनीकर व सचिव तथा युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव गजाननजी भोपनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास नागराळे यांनी केले, तर आभार उमेश आंबेनगरे यांनी मानले .अशाप्रकारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
