‘ आल्या’… ‘गेल्या’… ‘जेवलालाव’… या सारख्या भाषिक शब्दकळेवर भौगोलिक घटकांचा प्रभाव – प्रा. डॉ. सचिन गर्जे

अखेर नांदेडच्या ‘आल्या’… ‘गेल्या’ तर लातूरच्या ‘आलाव’… ‘गेलाव’ भाषेचे दडलेले रहस्य भूगोलात सापडत असल्याचे डॉ.सचिन गर्जे यांनी केले सप्रमाण सिद्ध

अहमदपूर (एल पी उगीले) : भाषेचे मार्दव हे प्रदेश, विभाग निहाय व भाषिक प्रांत रचनेनुसार होत असले तरी नांदेड जिल्ह्याची ‘आल्या’…’ गेल्या’… तर लातूरची ‘आलाव’… ‘गेलाव’… या सारख्या साद शब्दकळेंची भाषाशैली वेगळी उमटून पडते. तिच्या या वेगळेपणाच्या उच्चार शैलीवर भौगोलिक घटकांचा प्रभाव असून त्याचे रहस्य भूगोलात दडले असल्याचे सप्रमाण प्रा. डॉ. सचिन गर्जे यांनी आपल्या संशोधन लेखातून सिद्ध केले आहे.

' आल्या'… 'गेल्या'… 'जेवलालाव'… या सारख्या भाषिक शब्दकळेवर भौगोलिक घटकांचा प्रभाव - प्रा. डॉ. सचिन गर्जे

अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन गर्जे हे भूगोल विभागात मागील बारा वर्षापासून कार्यरत आहेत. यांनी नुकताच एक संशोधन लेख… मध्ये प्रकाशित केला असून यांच्या या संशोधनात नांदेड ‘टच’ असलेली ‘आल्या’ …’गेल्या’…बसल्या, जात्या, जेवल्या ही वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळा असलेल्या भाषा शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तर लातूरची ‘आलाव’… ‘गेलाव’ ही भाषा राज्यात परराज्यात गेलं की या उच्चार शैलीवरून समोरचा माणूस तुम्ही नांदेडचे काय? तसेच उदगीर वा लातूर जिल्ह्याचे आहात काय..? म्हणून विचारतो. अशी शब्दकळा अस्तित्वात येण्यामागे कोणता घटक कारणीभूत आहे? याचा भौगोलिक व भाषिकतेचा शोध घेत असताना त्यांनी उदगीर हे उंचावरील ठिकाण आहे तर नांदेड हे कमी उंचावरील ठिकाण आहे. हे दोन्ही ठिकाणं निवडून त्यांचा तौलनिकदृष्टया अभ्यास डॉ. सचिन गर्जे यांनी केला आहे. या संशोधनात त्यांना असे आढळून आले आहे की, ‘वायुभार’ हा घटक ध्वनी उच्चार शैलीवर प्रभाव टाकत असतो हे जाणवून आले.

आपल्या संशोधनामध्ये त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, उदगीर तालुका वा लातूर जिल्हा हे उंचावरील ठिकाणं असून येथे वायुभार हा कमी आहे. तर नांदेड जिल्हा हा कमी उंचावरील ठिकाण असल्याने येथे वायुभार हा जास्त आहे.. या कारणांमुळे उच्चार करत असताना नांदेडच्या व्यक्ती जास्त वायुभाराच्या दाबामुळे कमी वेळेत उच्चार पूर्ण करतात व उच्चारांच्या शेवटी ‘ल्या’ हा प्रत्यय लावतात. तर या उलट उदगीरच्या व्यक्ती ह्या उच्चाराच्या शेवटी कमी वायुभारामुळे ‘आलाव’, गेलाव, करू लावाव, जेवलालाव हा दीर्घ उच्चाराचा ‘प्रत्यय’ लावून उच्चार पूर्ण करण्यासाठी दीर्घ वेळ घेतात.

प्रा. डॉ. सचिन गर्जे यांनी आपल्या संशोधनात स्थानिक ‘भाषा’आणि ‘उच्चार’ यावर भौगोलिक घटक परिणाम करत असतात याबाबत महत्वपूर्ण असे विस्तृत विवेचन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!