दापका येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न
दापका (एल.पी.उगीले) : सीमा भागातील बिदर जिल्ह्यामध्ये कमालनगर तालुक्यात भवानी दापका येथे प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये राष्ट्रमाता माता जिजाऊ माँ साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,व स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन जिजाऊ वंदनाने करण्यात आली. नंतर प्रमुख व्याख्याते सूप्रसिध्द शिवव्याख्याते सिद्धेश्वर लांडगे यांनी मांसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री यांचे चरित्र व कार्य हे आजच्या यूगाला आदर्श, मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. हिच काळाची गरज असल्याने सर्वांनी हा आदर्श पाळला पाहिजे असे सांगितले.
आजच्या सावित्रीने आजच्या पिढीला प्रबोधन करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे .शिवबा घडवण्यासाठी आधी माता जिजाऊ कळली पाहिजे. शहाजीराजे घडले पाहिजेत, असे उद्गार काढले .प्रा. प्रदीप बिरादार प्रमुख अतिथी यांनी विवेकानंदाच्या चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक शाळेचे मूख्याध्यापक भानुदास वासरे, विलासराव भाऊराव जाधव गुरुजी माजी आदर्श मुख्याध्यापक, औराद भूमी विकास बँकेचे संचालक, शालेय सुधार समिती अध्यक्ष अंकुशराव वाडीकर, केंद्र प्रमुख सी. आर .सी. व्यंकटराव बिरादार ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ सुनंदा कोंगे , सचिन शिंदे चिखली, प्रास्ताविक भाषण शिवाजी सिगरे यांनी केले.
विलास गुरुजी यांनी आजची शिक्षण पद्धती ही कृती व दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून घेतली पाहिजे, असे नमूद केले. अंकुश वाडीकर यांनी शाळेतील शैक्षणिक परिवर्तन घडवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांची उपस्थिती याकडे लक्ष दिले पाहिजे, असे थोडक्यात सांगितले. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश वाडीकर यांच्याकडून सर्व शिक्षकाचे शाल व महापुरुषांचे ग्रंथ देऊन सम्मान करण्यात आला.विद्यार्थ्यानी आई जिजाऊ ,सावित्रीबाई आणि स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा करून सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव कुमार बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश सावळे यांनी केले. शाळेतील शिक्षक वसंत विलासपुरे, बसव स्वामी ,सौ. अर्चना शिंदे ,सौ. राजश्री कदम ,व प्राथमिक शाळेचे अशोक जाधव, मारुती बिरादार, गुणवंत बिरादार, सौ. सुवर्णा खंदाडे , सौ. अर्चना सुरशेटवार, सौ. सुप्रिया काळे ,या सर्व शिक्षकवृंदाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. गावातील व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील श्रोते बहु संख्येने उपस्थित होते.
