पर्यावरण संवर्धनासाठी भौगोलिक ज्ञान अत्यावश्यक – डॉ. बब्रुवान मोरे

पर्यावरण संवर्धनासाठी भौगोलिक ज्ञान अत्यावश्यक - डॉ. बब्रुवान मोरे

अहमदपूर (गोविंद काळे) : आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गच मानवाला जीवन कसे जगावे, हे शिकवतो म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी भौगोलिक ज्ञान प्राप्त करणे आत्यावश्यक आहे, असे ज्येष्ठ पर्यावरणवादी अभ्यासक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. बाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भूगोल दिना’ च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर, विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक डॉ.बब्रुवान मोरे, आई. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रो. डॉ. नागराज मुळे, भूगोल विभागप्रमुख डॉ. डी. एन. माने यांच्यासह डॉ. सचिन गर्जे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विविधता पहावयास मिळते त्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी भूगोल हा महत्त्वाचा विषय आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी. एन. माने यांनी उपस्थित मान्यवरांना तसेच विद्यार्थ्यांना ‘नदी बचाव ‘ ची शपथ दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोलशास्त्र आहे.या अंतराळामध्ये एक ब्रह्मांड,दोन ध्रुव, तीन पृथ्वीचे अंतरंग विभाग, चार प्रकारची सजीव, चार महासागरे, पाच तत्व, सहा ऋतू , सात खंड, आठ भूस्वरूपे, नऊ खगोलीय प्रकार आणि दहा दिशा या सर्वांचा अभ्यास भूगोलशास्त्रामध्ये केला जातो. असेही, ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी केले तर, सूत्रसंचालन भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ. सचिन गर्जे यांनी केले. आभार संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले. यावेळी डॉ.सतीश ससाणे,प्रा. ए. सी. आकडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!