अक्षरनंदन शाळेत क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

अक्षरनंदन शाळेत क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अक्षनंदन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागाअंतर्गत क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी क्रीडा स्पर्धेचे रीतसर उद्घाटन करून स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धा वैयक्तिक व सामायिक स्वरूपात घेण्यात येणार असून या मध्ये धावणे, संगीत खुर्ची, खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उडी, लिंबू चमचा, या सर्व स्पर्धांना शिशुगट पासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माधवरावजी हालगरे गुरुजी तर उद्घाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक चरले, ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्षरनंदन शाळेच्या अध्यक्षा भारतबाई सावळेताई होत्या. त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवशंकर जीवणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मारुती बिरादार व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!