रामकृष्ण धायगुडे यांची नांदेड विभागीय सहसंचालकपदी निवडीबद्दल जंगी सत्कार

रामकृष्ण धायगुडे यांची नांदेड विभागीय सहसंचालकपदी निवडीबद्दल जंगी सत्कार

नांदेड (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण नांदेड विभागाच्या विभागीय सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. डॉ. रामकृष्ण धायगुडे यांचा आज शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक संघटना, रा.स.प.चे जिल्हाध्यक्ष‌नागनाथ बोडखे यांच्यासह विविध संघटना व मान्यवरांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. डॉ. रामकृष्ण माणिकराव धायगुडे यांची जन्मभूमी मराठवाडा असून बीड जिल्ह्यातील ता.अंबाजोगाई बनसारोळा येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धायगुडे यांनी एम.फिल,पीएच.डी अशा शिक्षण क्षेत्रातील सर्वच पदव्या उत्कृष्ट रित्या संपादन केल्या आहेत.

औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर अमरावती येथे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. अमरावती येथील विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात ते गणिताचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची नांदेडच्या विभागीय सहसंचालक पदी निवड केली असून नुकताच त्यांनी डॉ. विठ्ठल मोरे यांच्या कडून नांदेड येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

याप्रसंगी त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी , भव्य असा स्वागत समारंभ पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आला. यावेळी मराठीचे ज्येष्ठ समीक्षक व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बिरादार पाटील यांच्यासह देगलूर महाविद्यालय, देगलूर येथील मराठी विभाग प्रमुख तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य, मनमिळाऊ स्वभावाचे, सव्यसाची समीक्षक डॉ. विठ्ठल जंबाले, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील हिंदी विभागातील सहायक प्राध्यापक, एन. एस.एस. चे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर, बाबुराव नाईक, प्रा. डॉ. अभिमन्यू पाटील, डॉ. अरविंद नवले, डॉ.गणपतराव कारिकंटे, डॉ. संतराम मुंढे, प्राचार्य डॉ. विनायक जाधव, प्रा. डॉ. डी डी पवार, वसमतचे माजी प्राचार्य डॉ. इंगळे, प्राचार्य डॉ. कोलपुके, प्राचार्य डॉ. आगलावे, डॉ. सुरेश शेळके, डॉ. मारोती कसाब, डॉ. सतीश ससाणे, रामदास हाके पाटील, प्रा. डॉ. नामदेव सोडगिर, डॉ. रंजन येडदकर यांच्यासह लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालय, नांदेड येथील कार्यालयीन कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author