यशवंत विद्यालयाचा विश्वास फड स्वाश स्पर्धेत विभागात सर्वप्रथम राज्यास पात्र

यशवंत विद्यालयाचा विश्वास फड स्वाश स्पर्धेत विभागात सर्वप्रथम राज्यास पात्र

अहमदपूर ( गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे दिनांक 16 रोजी सतरा वर्षीय क्याश विभागीय स्पर्धेत यशवंत विद्यालय अहमदपूर चा विश्वास लक्ष्मणराव फड हा विभागीय स्पर्धेत सर्वप्रथम राहिलेला असून तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख संतोष कदम, दीपक हिंगणे, प्रभावती मिरजकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. गंपले, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!