उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. रामकृष्ण धायगुडे व डॉ.विठ्ठ्ल मोरेंचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण नांदेड विभागाच्या विभागीय सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. डॉ. रामकृष्ण धायगुडे यांचा व डॉ. विठ्ठल मोरे यांचा विभागीय सहसंचालक पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, डॉ. रामकृष्ण माणिकराव धायगुडे यांची जन्मभूमी मराठवाडा असून बीड जिल्ह्यातील ता.अंबाजोगाई बनसारोळा येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धायगुडे यांनी एम.फिल,पीएच.डी अशा शिक्षण क्षेत्रातील सर्वच पदव्या उत्कृष्ट रित्या संपादन केल्या आहेत. तसेच सहसंचालक पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल डॉ. विठ्ठल मोरे हे शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे कार्यरत आहेत या दोघांचाही सत्कार किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी तसेच शिवाजी महाविद्यालय, उदगीरचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत असलेल्या महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर व श्री शिवाजी महाविद्यालय उदगीरचे प्राध्यापक उपस्थित होते. त्यात डॉ.मोरोती कसाब, डॉ.सतीश ससाणे, एन. एस. एस.चे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. पी. डी. चिलगर, ग्रंथपाल परमेश्वर इंगळे, डॉ. अरविंद नवले, डॉ. रंजन येडदकर यांचा समावेश होता.