मुलांनो,मोबाईलचे गुलाम बनू नका – गुडसूरकर
अंबाजोगाई (एल.पी.उगीले) : साधनांचा अविवेकी वापर हा विनाशाकडे नेतो,मोबाईलच्या बाबत आपले नेमके तेच होत आहे,गरज म्हणून आलेल्या या साधनाचे आपण कधी गुलाम झालोय, हे कळलेच नाही,या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी ईतर छंदात गुंतवून घ्या.”असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले.
खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी स्नेहसंमेलनानिमित्त बक्षीस वितरण व प्रकट कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
भा.शि. प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, ज्येष्ठ साहित्यिका डॉ.शुभदा लोहिया, खोलेश्वर संकुलाचे कार्यवाह बिपीन क्षीरसागर,शालेय समिती अध्यक्ष डॉ.अतुल देशपांडे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अविनाश मुडेगावकर,मु.अ. निवृत्ती दराडे,किशनराव महामुनी, संमेलनप्रमुख जयेंद्र कुलकर्णी ,विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी होळकर,संदेश कांदे उपस्थित होते. “शालेय जिवन हे जिवनाला जसे आकार देणारे असते तसेच ते आनंद देणारेही असते,पण मोबाईल नावाच्या राक्षसाने आपल्या जगण्यातील आनंदच हिरावून घेतला आहे,तो पुन्हा मिळवायचा असेल तर या मोहातून दूर या.” असा सल्ला गुडसूरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. शालेय जिवनातील विविध घटनांचा संदर्भ देत गुडसूरकर यांनी आपल्या कथाकथनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.डॉ .अतुल देशपांडे यांनी प्रास्तविक केले.विज्ञान व कला प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.अटल टिंकरिंग लॕबमधील उपक्रमाची माहिती मोरेश्वर देशपांडे यांनी दिली.
भाशिप्रचे कार्यवाह डॉ . हेमंत वैद्य म्हणाले,” शालेय स्नेहसंमेलन हे अभिव्यक्त होण्याचे साधन आहे”. डॉ .शुभदा लोहिया यांनी विज्ञानातील कला व कलेमधील विज्ञान समजून घेण्याची गरज प्रतिपादन केली. राजेंद्र शेप यांनी पाहुण्यांचा परिचय दिला.बक्षिसवाचन धनंजय जब्दे,प्रशांत पिंपळे,मिलिंद जोशी यांनी केले. श्रीकांत काळे यांनी सूत्रसंचालन तर आभार विलास ठाकूर यांनी केले. मंगेश मुळी यांनी कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थी ,शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.