समजून घेण्यातच साहचर्याची श्रीमंती – धनंजय गुडसूरकर
‘साधा माणूस’चे पुणे येथे प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी) : ‘परस्परांना समजून घेणे म्हणजे साहचर्य होय,ज्यांना हे जमतं त्यांच्या आयुष्यात साहचर्याची श्रीमंती निश्चित असते,’साधा माणूस ‘ मध्ये याची अनुभूती येते’असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले.कल्पना पाटील यांच्या ‘साधा माणूस’ या ग्रंथाचे प्रकाशन श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झाले.अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य प्राचार्य श्रीमंतराव भोसले होते प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहनिबंधक डॉ .संजय भोसले,सो.चित्रा शहा,डॉ .सुभाष बुद्रुक,लेखिका कल्पना पाटील उपस्थित होते.
डॉ .संदेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.”नात्यांची वीण उसवत असताना मागील पिढीने टिकवून ठेवलेला परस्परपूरक जगण्याचा मार्गदर्शक पथ’साधा माणूस’ मधून उलगडतो”असे मत श्री.गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.यावेळी सज्जन पाटील आरवडे,अॕड.मुकुंद ननावटे,डॉ .सौ.स्मिता पाटील,सुनिल कुंभार,व्ही.पी.पवार,सौ.सविता कुरुंदवाडे,विभागीय सहनिबंधक डॉ .संजय भोसले यांचीही यावेळी भाषणे झाली.प्राचार्य श्रीमंत भोसले यांनी अध्यक्षीय समारोप केला.वसंत पवार यांनी सुत्रसंचालन तर श्रेणिक पाटील यांनी आभार मानले.