शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंचा अंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग

शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंचा अंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग

उदगीर (एल.पी.उगीले) : गुरु नानक देव विश्वाविद्यालय अमृतसर (पंजाब ) येथे आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तायकवंडो महिला स्पर्धेसाठी येथील शिवाजी महाविद्यालय उदगीरची खेळाडू कु. कांबळे निकिता राजकुमार, रक्षिता प्रशांत बी. ए. प्रथम वर्ष यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संघाचे प्रतिनिधित्व केले.

खेळाडूंच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष चामले नामदेव,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव,उपप्राचार्य, डॉ एस. व्ही. जगताप, उपप्राचार्य डॉ आर. एम. मांजरे,कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल अहमद, प्रा. माने गजानन यांनी मार्गदर्शन केले.

About The Author

error: Content is protected !!