वांजरवाडा पाटी ते जळकोट निकृष्ट रस्ता करणाऱ्या गुत्तेदार चे नाव काळया यादी मध्ये टाका अन्यथा प्रहार चे बोंब मारो आदोंलन
जळकोट (एल.पी.उगीले) : वाजंरवाडा पाटी ते जळकोट पर्यंत झालेल्या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराचे नाव काळया यादीमध्ये टाकुन कार्यवाही करन्याची प्रहार पक्षाची मागणी. जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत वांजरवाडा पाटी ते जळकोट रस्ता खडीकरण व डांबरीकरण झालेला असून सदरील काम पाहता अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असे दिसून येते. रस्ता करुन पंधरा दिवस झाले नाही तर ठिक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडूण संपूर्ण रस्ता उखडला गेला आहे.
अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संस्थेचे नाव काळया यादीमध्ये टाकावे, व गुत्तेदार यांच्या कडून तो रस्ता संपुर्ण उखडून परत नवीन करून घ्यावा. व गुत्तेदार व संबंधित शासकीय अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अन्यथा 24 जानेवारी 2023 रोजी जि.प.उपअभियंता सा. बां.विभाग कार्यालय, उदगीर. समोर जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो प्रहार सेवक च्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन उपअभियंता जि.प.बांधकाम विभाग यांना प्रहार चे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, ता.अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे, ता उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, कार्याध्यक्ष महादेव आपटे, उपाध्यक्ष संदीप पवार व इतर प्रहार सेवकच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे .