संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या जयंतीनिमित्त अखंड शिवनाम सप्ताह व शिव पंचाक्षरी जपयज्ञ सोहळा
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : येथील श्री ग्रामदैवत महादेव मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या ४६२ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दि. २० जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत अखंड शिवनाव सप्ताह शिवपंचाक्षरी जपयज्ञ सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यामध्ये या सप्ताहामध्ये दररोज सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ८ वाजता परमरस्य पारायण, सकाळी १०जपयज्ञ सोहळा , सकाळी ११ सिद्धलिंग महास्वामीजी यांची पाद्य पूजा व आशीर्वाचन, दुपारी १२ वाजता प्रसाद यानंतर गाथा भजन मनमत स्वामी चरित्र, शिवपाठ, शिव किर्तन ,शिवजागर आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या सप्ताह मधील कीर्तनकार व प्रवचनकार संगमेश्वर बिरादार वलांडी, वर्षाताई स्वामी लोहारा, सौ स्वातीताई तंगशेट्टी राजदाबका, किशोरीताई ताकबिडकर, भूषण स्वामी महाराज वाखरीकर, विरुपाक्ष वैरागकर लोहारा, शिवानंद महाराज अहमदपूर आदींचे कीर्तन व प्रवचन होणार आहेत.
या सप्ताहामध्ये सौ अरुणाबाई चनबस बेटकर, सौ गोदावरीबाई बाबुराव कंटे, सौ शोभाबाई श्रीमंत लुल्ले, सौ मंगलबाई कलपा घटबाळे, सौ रेखाबाई वसंतराव डोंगरे, श्रीमती भारतबाई वैजनाथ जीवने, सौ. संगीताबाई जीवणे आदी अन्नदाते आहेत. गुरुवारी (दि. २६) जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मन्मथ स्वामी माऊलीचे पाळणा व पालखी, ग्रंथ दिंडी महादेव मंदिर येथून देवणी शहराच्या मुख्य मार्गावरून निघेल.(दि२७) जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे महाप्रसादाचे कीर्तन,त्यानंतर सौ शांताबाई अशोक कुमठे यांच्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचे भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे मन्मथ स्वामी जयंती उत्सव समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.