स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,1 लाख 28 हजार रुपयाचा गांजा जप्त; तिघावर गुन्हा दाखल, एकाला अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सक्रिय झाली असून, नशापाणी करण्यासाठी, आर्थिक फायदा करून घेण्यासाठी गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक लाख 28 हजार रुपयांचा गांजा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांडेश्वर शिवार गट नंबर 169 तालुका,जिल्हा लातूर येथे छापा टाकून शेतात झुडपामध्ये गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी खाताच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेला 3 किलो 670 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 1,28,450/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य यांच्या फिर्याद वरून काशिनाथ गोविंद चव्हाण, वय 60 वर्ष, राहणार हसाळा, तालुका औसा जिल्हा लातूर. याच्यासह इतर दोघांवर पोलिस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर. 22/2023 कलम 20 (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act ) 1985 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची अवैध विक्री करण्यासाठी खाताच्या पोत्यामध्ये भरून ठेवलेल्या गांजा सह मिळेल आलेला इसम नामे काशिनाथ गोविंद चव्हाण यास अटक करून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता मुद्देमालासह पोलीस ठाणे लातूर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच नमूद उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ग्रामीण सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सपोनि सचिन द्रोणाचार्य , पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, सहाय्यक फौजदार राजाभाऊ सूर्यवंशी, पोलीस अंमलदार नितीन कठारे , रवी कानगुले, तुराब पठाण, सचिन धारेकर, सचिन मुंडे, चंद्रकांत केंद्रे, सदानंद योगी, संपत फड व दोन शासकीय पंचासह दिनांक 19/01/2023 रोजी चांडेश्वर तालुका लातूर या ठिकाणी छापा मारून झुडूपामध्ये लपुन गांजाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी कब्जात बाळगलेल्या 1 लाख 28 हजार 450 रुपये किंमत असलेल्या गांजासह मिळून नमूद आरोपीस अटक करून त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल 3 किलो 670 ग्रॅम एवढा गांजा जप्त केला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक पाटील हे करीत आहेत.