शिवाजी महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव रॅलीचे स्वागत

शिवाजी महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव रॅलीचे स्वागत

उदगीर (एल.पी.उगीले) : आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व आजादी का अमृत महोत्सव समिती लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे आगमन शिवाजी महाविद्यालय सकाळी 10 वाजता झाले. जय जवान चौकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव , उपप्राचार्य डॉ एस व्ही जगताप, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही आर भोसले, पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मशाल रॅलीचे स्वागत केले. त्या ठिकाणाहून महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक जाधव यांनी मशाल आपल्या हाती घेऊन मुख्य रस्त्याने शिवाजी महाविद्यालयाकडे प्रयाण केले. शिवाजी महाविद्यालयात आल्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मशाल रॅलीतील सहभागी सर्वांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. याप्रसंगी मशाल रॅलीतील सहभागी प्राध्यापक डॉ गौरव जेवळीकर, डॉ साईनाथ उमाटे, डॉ डी के सावंत ,डॉ सुदर्शन पेडगे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देशभक्तीपर गीत ,वंदे मातरम, भारत माता की जय अशा राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. याप्रसंगी 75 थोर महापुरुषांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी प्रदर्शनीय चित्रीकरण उभे करण्यात आले. साईनाथ उमाटे यांनी प्रास्ताविकातून थोर स्वातंत्र्य सेनानीने भारत देशासाठी कशा पद्धतीने लढा दिला, युवकांनी कशा पद्धतीने जीवन जगले पाहिजे. यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची प्रतिज्ञा दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एस एम कोणाळे यांनी तर आभार ग्रंथपाल डॉ व्ही एम पवार यांनी मानले. यावेळी स्टाफ सेक्रेटरी डॉ डी बी कोनाळे, क्रीडा संचालक निहाल अहमद, गजानन माने, गुरनाळे व्हि डी, प्राध्यापक ,कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

About The Author