लोकाधिकार संघ मराठवाडा प्रमुख सुरेंद्र अक्कनगिरे, सोलापूर जिल्हाप्रमुख सुहास काळे, धाराशिव जिल्हाप्रमुख नंदकुमार कापसे यांची नियुक्ती जाहीर

लातूर(एल.पी.उगीले) : लोकाधिकार संघाच्या रामेश्वर पावनधाम येडशी येथे झालेल्या द्वितीय वर्धापन दिन कार्यक्रमात लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी लोकाधिकार संघ मराठवाडा प्रमुखपदी उदगीर येथील सुरेंद्र माधवराव अक्कनगिरे, सोलापूर जिल्हाप्रमुख पदी सुहास रमेशराव शिंदे चिंचोली, तालुका बार्शी, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हाप्रमुख पदी नंदकुमार शिवाजीराव कापसे तर जिल्हा उपप्रमुख पदी महादेव राजेंद्र काकडे, चाकूर तालुकाप्रमुख पदी शिवसांब अशोकराव नागलगावे, उदगीर शहरप्रमुख पदी व्यंकटेश अरुणराव पेन्सलवार, लोकाधिकार सेवा केंद्र लातूर कार्यालय प्रमुख पदी सादिक शेख आदी पदाधिकाऱ्यांच्या लोकाधिकार प्रमुखांनी नेमणुका जाहीर करून नियुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

लोकाधिकार संघ मराठवाडा प्रमुख सुरेंद्र अक्कनगिरे, सोलापूर जिल्हाप्रमुख सुहास काळे, धाराशिव जिल्हाप्रमुख नंदकुमार कापसे यांची नियुक्ती जाहीर

लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामेश्वर पावनधाम च्या वतीने शाल पुष्पहार घालून दत्तात्रय महाराज फुलारी आणि रामेश्वर पावनधाम चे अध्यक्ष कैलास महाराज दिवाने यांच्या हस्ते लोकाधिकार प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यावेळी बोलताना म्हणाले की, लोकाधिकार संघ ही प्रमाणिक कार्यकर्त्यांची टीम आहे. प्रशासन असो की लोकप्रतिनिधी असो जर सामान्य माणसाची अडवणूक करून त्याला कोण वेठीस धरत असतील तर अशा वेळी सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी लोकाधिकार संघ उभा राहत आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करणारी संघटना लोकाधिकार संघ आहे. राजकारण विरहित लोकाधिकार संघ समाजसेवा करत आहे. समाजाची सेवा हीच परमेश्वरी कार्य आहे. असे समजून आम्ही काम करत आहोत असे व्यंकटराव पनाळे यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

About The Author