विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवर्ती लवकरात लवकर जमा करा – डॉ.यश भिकाने

विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवर्ती लवकरात लवकर जमा करा - डॉ.यश भिकाने

निलंगा (एल.पी.उगीले) : निलंगा तालिक्यातील इंजीनियरिंग, फार्मसी, बि. कॉम.तसेच इतर पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच विद्यार्थ्यांचा मासिक भत्ता ही प्रलंबित आहे.त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांचा प्रलंबित प्रश्न सोडवावा व त्यांना न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथी सेनेचे जिल्हासंघटक डॉ. यश भिकाणे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या नंतर देखील जर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ही दिला आहे.

ह्यावेळी मनसे तालुकाध्यक्ष सूरज पटेल,म.न.वि.से तालुकाध्यक्ष पार्थ धुमाळ,उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी,प्रदीप माने,विभागाध्यक्ष गजेंद्र लोंढे,नितेश बिराजदार,प्रेम गायकवाड,अक्षय पांचाळ, ज्ञानसागर मेहत्रे, गजानन शिंदे आदींसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. गोरगरीब उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने शिष्यवृत्तीची योजना लागू केली आहे. मात्र झारीतील शुक्राचार्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने शेवटी नाईलाज म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेला आक्रमक होऊन निवेदन दिले आहे.

या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून शासकीय पातळीवर ज्या त्रुटी असतील, त्या सर्व शासकीय पातळीवरच निपटारा कराव्यात. आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल. असाही इशारा सदर देण्यात आला आहे.

About The Author