सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उदगीर (२०२३) बैठकीच्या आयोजन
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर शहरातील व तालुक्यातील सर्व शिवभक्त ,सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ,सर्व राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी , सर्व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व मुख्याध्यापक तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचलित चालणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की, प्रति वर्षाप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उदगीर शहरांमध्ये याही वर्षी फार मोठ्या थाटामाटात साजरी करावयाचे आहे. तरी या संदर्भात शिवजयंतीचे नियोजन करण्यासाठी तसेच सार्वजनीक शिवजयंतीची समिती स्थापन करण्यासाठी दिनांक 26 जानेवारी 2023 वार गुरुवार रोजी शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व शिवभक्तांनी ठीक 4:00 वाजता सदरील बैठकीसाठी शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच आपले मोलाचे विचार व्यक्त करून ही शिवजयंती अतिशय भारदस्त व नियोजनबद्ध साजरी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
