मुरुड येथील ग्राम विकास अधिकारी निलंबित !
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत म्हणून सर्व जिल्ह्यात परिचित असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायत वर कार्यरत ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम 6 (3) अन्वये ग्राम विकास अधिकारी एस आय शेख यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केल्याचे अधिकृत पत्र दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दिले आहे.
सदरील आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील तरतुदीच्या अधीन राहून महेश ज्ञानोबा कणसे यांनी केलेल्या चौकशी मागणीच्या अर्जानुसार ग्राम विकास अधिकारी ग्राम पंचायतीत बेकायदेशीररित्या मालमत्ता कर आकारणी, गावातील मालमत्ता सर्वेच्या नावाखाली अनियमितता करणे, दिनांक 26 जानेवारी 2018 रोजी बोगस ठराव घेऊन ग्रामसेवक संवर्ग संपावर असताना, दिनांक 26 जानेवारी 2018 रोजी बेकायदेशीर कार्यादेश दिले. इत्यादी केलेल्या अनियमित्ता व अपहार प्रकरणी श्री महेश ज्ञानोबा कणसे रा. मुरुड यांच्या तक्रारी अनुषंगाने विस्तार अधिकारी (पं) व विस्तार अधिकारी (सा) पंचायत विभाग जिल्हा परिषद लातूर यांचा चौकशी अहवाल आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांचा चौकशी अहवाल प्रमाणे चौकशी करून अहवाल सादर करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. सदरील दिनांक 11 जून 2019 च्या सुनावणीप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री एस आय शेख ग्राम विकास अधिकारी यांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय दिला आहे. त्याप्रमाणे संबंधितांना सामान्य प्रशासन पंचायत विभाग जिल्हा परिषद लातूर यांचे निलंबन आदेश क्रमांक 2019 /जि प ला /साप्रवि2/ ग्रापवी/ कार्या01/03/सी आर 06/कावी 395 दि.11/7/2019 अन्वये निलंबित करण्यात आले होते. परंतु निलंबनास कार्योत्तर मान्यता साठी संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा घेणेबाबत आदेशित केल्याने, निलंबरांची कार्यवाही होऊ शकली नाही. ग्रामविकास अधिकारी एस आय शेख यांना 24 जुलै 2019 अन्वये कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. संबंधितांनी त्यांचा खुलासा दिनांक 3 /8 /2019 अन्वये सादर करून त्यांचे वरील सर्व आरोप नाकारले आहेत. त्यानंतर श्री शेख ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा )शिस्त व अपील) नियम 1964 मधील नियम 6(3) अन्वये विभागीय खाते चौकशी आदेशित करण्यासाठी संचिका सादर केली असता, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा असा अभिप्राय दिले आहेत. त्यामुळे विभागीय खाते चौकशी आदेशित होऊ शकली नाही. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सुनावणी 14/6/ 2022 व 17 जानेवारी 2022 अन्वये सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात सुनावणी मध्ये श्री शेख एस आय ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत मुरुड तालुका लातूर यांना निलंबित आदेश गट स्तरावरून तामिल न झाल्याने निलंबन आदेशाचे अंमलबजावणी झालेली नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर सामान्य प्रशासन पंचायत विभाग जिल्हा परिषद लातूर यांचा निलंबन आदेश निर्गमित करण्यात आलेला रद्द करण्यात येत असून एस आय शेख ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत मुरुड तालुका लातूर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक नियम) 1967 च्या कलम 3 चा भंग केल्याने व संदर्भ क्रमांक चार व पाचच्या अहवालानुसार संबंधितांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील 3 (1 )(अ) नुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी 19 जानेवारी 2023 रोजी दिला आहे. सदरील आदेशामुळे निलंबनाची कारवाई अधिकृतरित्या पूर्ण होईल. अशी अपेक्षा मुरुडच्या जनतेला आहे.
