मातोश्री सार्वजनिक वाचनालय, तिवटग्याळ येथे प्रजासत्ताक दिन व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

मातोश्री सार्वजनिक वाचनालय, तिवटग्याळ येथे प्रजासत्ताक दिन व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. प. प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

उदगीर(एल.पी.उगीले) : तालुक्यातील तिवटग्याळ येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता. उदगीर जि. लातूर येथे शाळेतील ध्वजारोहनानंतर “वाचनालय शाळेच्या दारी” अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य व खुर्च्या प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी वाचाल तर वाचाल, पुस्तक हे मस्तक असते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहेत की, जो कोणी शिक्षण घेईल, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही अशी सविस्तर माहिती दिली. तद्नंतर उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. या वेळी गावचे नुतन सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, पोलीस पाटील धनराज पाटील, माजी सरपंच सौ. उज्ज्वलाताई नरहरे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, वर्षा श्रीमंगले, जयसिंग पाटील, भैरवसिंह पाटील, आकाश पाटील, एकनाथ पाटील, शुभांगी पाटील, प्रवीण कांबळे, प्रशांत कांबळे, महेश पाटील, धर्मा क्षीरसागर, अक्षय कांबळे, शिवशंकर बिरादार, आदीत्य पाटील, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!