शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावू नयेत अन्यथा कारवाई करण्यात येईल – मुख्याधिकारी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावर विविध राजकीय पक्षाचे व अन्य उपक्रमाचे लावण्यात येणारे होर्डिंग्ज परवानगीशिवाय लावू नयेत, अन्यथा अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिला आहे.
उदगीर शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी काही जागा ठरविण्यात आल्या आहेत. ठरलेल्या ठिकाना व्यतिरिक्त अन्यत्र ठिकाणी अनधिकृत पणे होर्डिंग्ज लावणे न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात असून अशा अनधिकृत होर्डिंग्ज धारकांनी असे बॅनर लावू नये. असे आवाहन करून मुख्याधिकारी कोकरे यांनी शहरात बॅनर लावण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून क्यू आर कोड घेऊनच आपले होर्डिंग्ज लावावेत. अशी सक्त सूचना केली आहे.
