वाढवणा येथे दोन दिवसापासून एरटेल रेंज येत नाही संबंधितांचे दुर्लक्ष ग्राहक नाराज
वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु येथील एरटेल सेवा विस्कळीत झाली असुन दोन दिवसापासून रेंज येत नसल्यामुळे कॉल सुद्धा जात नाहीत. महत्वाचे काही काम असेल तर झटपट सेकंदात माहिती देण्यासाठी मोबाईल वरून संभाषण करत सर्व माहिती दिली जाते. मात्र दोन दिवस झाले, नेट पण चालत नाही. त्यामुळे सोशल मीडिया, व्हाट्सअप वर काही आवश्यक फोटो व माहिती देण्यासाठी व तरुणांना तर मनोरंजन साठी रम्मी, तसेच गेम खेळण्यासाठी नेट आवश्यक आहे. नेट शिवाय कोणतेच काम होत नाही. मोबाईल हातात चालु असल्याशिवाय करमत नाही. कोणतीही गोष्ट झाली तर अगोदर मोबाईल वरूनच संभाषण करून माहिती घेतली व दिली जात असल्यामुळे नेटवर्कची अत्यंत गरज असताना देखील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षा मुळे दोन दिवसा पासुन रेंज सतत जात असल्यामुळे एरटेल सिमधारक परेशान असुन लवकरात लवकर दुरुस्ती करून नेटवर्क सेवा पुरवर्त चालु करून ग्राहकांची गैरसोय दुर करावी. अशी मागणी जोरात चालु आहे.
