हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाणाच्या ऐवजी महामानवांच्या ग्रंथांची भेट
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : समाजातील सर्व स्तरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे.समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन या सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहेत.सहजासहजी हळदी कुंकाच्या वानात बांगड्या,कानातील वस्तू,डोक्याची पिन,नाकातील नथ,पायातील चैन अश्या अनेक विविध वस्तू देऊन हळदी कुंकवाचा सण साजरी केला जातो.असाच एक हळदी कुंकवाचा अनोखा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने देवणी शहरातील भैय्यासाहेब देवणीकर यांच्या घरी साजरी करण्यात आला.या कार्यक्रमात स्त्रियांनी वाण न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राणी लक्ष्मीबाई,मदर तेरेसा,राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,आदी महामानवांची ग्रंथ भेट देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी सुजाता देवणीकर, सोनाली कापडे, जयश्री जामगे, नेहा पोतदार,बिंदू पतंगे, कल्पना जाधव, सुमित्रा इंगोले आदी स्त्रिया उपस्थित होत्या.
