वक्तृत्व स्पर्धेत हावगीस्वामीच्या सविता मलकापुरे यांना दुसरे पारितोषिक

वक्तृत्व स्पर्धेत हावगीस्वामीच्या सविता मलकापुरे यांना दुसरे पारितोषिक

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने आयोजित उदगीर स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील कु.सविता संजय मलकापुरे या विद्यार्थिनींनी दुसरे पारितोषिक प्राप्त केले. विद्रोही संत तुकाराम या विषयावर त्यांनी मांडणी केली होती. लातूर येथील माजी प्राचार्य व विचारवंत डॉ.नागोराव कुंभार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे पारितोषिक देण्यात आले. प्रमाणपत्र, ग्रंथ व तीनशे रुपये रोख रक्कम असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.

या यशा बद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीतील डॉ.म.ई. तंगावार, प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!