राष्ट्रीय सेवा योजनेतून आदर्श नागरिक घडतात – ज्ञानदेव झोडगे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेला महत्त्वाचे स्थान असते.हा विभाग महाविद्यालयाचा एक महत्त्वाचा स्तंभ असतो. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. मी माझ्यासाठी नाही तर मी सामाजिक बांधिलकीतून कार्य केले पाहिजे. ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रासेयो च्या मार्फत रुजवली व पेरली जाते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून घडलेला विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळा असतो. तो संवेदनशीलपणे समाजाकडे व माणसाकडे पाहायला शिकतो. त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम व एकात्मतेची भावना असते. अशा शिबिरातून आदर्श नागरिक घडतात, असे विचार किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांनी व्यक्त केले. ते शिवाजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या बामणी येथील विशेष युवक नेतृत्व वार्षिक शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेव चामले, कार्यकारणी सदस्य माधवराव पाटील, अजित पाटील तोंडचिरकर, प्राचार्य डॉ.विनायकराव जाधव,सरपंच सौ प्रभावती बिराजदार, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजकुमार बिराजदार, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे ,अधीसभा सदस्य डॉ विष्णू पवार, मुख्याध्यापक वाय एम पठाण, ग्रा.प.सदस्य म्हेत्रे, बाबासाहेब बिरादार, सुनील पाटील, बालाजी पाटील, चेअरमन पद्मीनबाई मुदाळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री झोडगे यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे तसेच ग्रामपंचायत मौजे बामणी व शिवाजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने हणमंत देवराई येथे करण्यात आलेल्या महावृक्ष रोपणाचे व संवर्धनाचे कौतुक केले. राजकुमार बिराजदार यांनी शिवाजी महाविद्यालयाने आमचे गाव दत्तक घेऊन गावाचा कायापालट केला. असे गौरवोद्गार काढून आभार व्यक्त केले. याप्रसंगी अजित पाटील तोंडचिरकर,आर एम मांजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी बामणी या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी आमचे महाविद्यालय ग्रामपंचायत सोबत सदैव राहील, असा विश्वास देत स्वयंसेवकाचे व कार्यक्रमाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. जि प प्रशाला बामणी येथील विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ एस व्ही शिंदे यांनी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा नागरगोजे यांनी तर पाहुण्यांचा परिचय आदित्य टेकाळे यांनी करून दिला. सय्यद अंनिस,राणी शेळके अपेक्षा गुरुडे, राज कांबळे, संगमेश्वर बिराजदार इत्यादी स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब बिरादार यांनी ग्रामपंचायतीतर्फे, मुख्याध्यापक पठाण यांनी जि प शाळेतर्फे तर सचिन सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातर्फे सर्वांचे आभार व्यक्त केले .कार्यक्रमाधिकारी प्रा. ए एस टेकाळे,प्रा. बालाजी सूर्यवंशी यांच्यासोबतच शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद पाटील ,नितीन शेंडगे, विद्यार्थी प्रतिनिधी अर्जुन कांबळे व स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
