श्यामलाल हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणी आर्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये, संस्था सहसचिव अंजुमणी आर्य तसेच संस्था मान्यवर पी. जी. पाटील, अभंगराव कोयले, मोहनराव निडवंचे, भागवत घोळवे, एस. एम. बिरादार, ऍड. चटणाळे, अमित पाटील, बी. एन. सोनकांबळे, उषाताई तोंडचिरकर, पंडित सूर्यवंशी, पटणे सर, देवर्षे सर, श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्ञाते तृप्ती, श्यामलाल प्राथमिक विद्या मंदिर चे मुख्याध्यापक विवेक उगीले, पारिजातक शिशुविहार च्या प्रमुख मोरतळे ताई इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देवणे श्रुती, बिरादार साईविश्व, शिंगडे संचिता या विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या भाषण केले. उत्कृष्टरित्या भाषण केल्याबद्दल प्रमुख अतिथींनी या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मान केला.
देशभक्ती व पर्यावरण विषयक जागृती नृत्य सादरीकरण मोरे सृष्टी, पात्रे प्रेरणा , क्रांती भंडे, सुप्रिया श्रीमंगले, केसरोळे दुर्गा, जान्हवी बिरादार, श्रुती दिवणे , खुशी कमलापुरे, गुणाले, शिंदे सीमा या विद्यार्थिनींनी उत्कृष्टरित्या केले त्याबद्दल मान्यवरांनी या विद्यार्थिनींना रोख पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन केले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एन.एम. एम.एस.स्पर्धा परीक्षा, विविध क्रीडा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्था पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक मेडल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व भारतीयांनी आपला अन्यायाविरुद्ध संघर्षाचा इतिहास कधीही विसरू नये, प्रत्येक नागरिकांनी देशाच्या, समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपला भारत देश विकसित व सामर्थ्यशाली बनविण्याचा प्रयत्न करावा, भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी सर्व नागरिकांनी आपली कर्तव्य व्यवस्थित रित्या पार पाडावीत असा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी, हाके नामदेव यांनी केले, ध्वजारोहणासाठी प्रमुख अतिथीस पाचारण सोनाळे बालाजी यांनी केले, दर्शनी फलकावर थोर महापुरुषांचे चित्र बालाजी चव्हाण यांनी आकर्षक रित्या काढले, कार्यक्रमाचे आभार संजय देबडवार यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
