शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उदगीर : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक बाबूराव आडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार होते.तर व्यासपिठावर संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे, जेष्ठ स्वयंसेवक प्रमोदराव कुलकर्णी ,अर्थसमितीचे अध्यक्ष अॕड.शिवाजी बिरादार,स्वामी विवेकानंद वसतीगृहाचे अध्यक्ष षण्मुखानंद मठपती ,संस्था सभासद मोहिनी अचवले ,प्रमुख वक्ते एकनाथ राऊत, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांची उपस्थिती होती.प्रजासत्ताक दिनानिमित्त NCC विभागातर्फे विभाग प्रमुख विष्णू तेलंग व मयूर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करून ध्वजाला व मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.

शास्त्री विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रमुख वक्ते एकनाथ राऊत यांनी भारतीय लोकशाहीची अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी तालूकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेले लक्ष्मी बिरादार व श्रिया महामुनी या विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक गुरुदत्त महामुनी,आशा कल्पे ,प्रिती शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार वाघमारे वैयक्तिक गीत अक्षरा दुरूगकर ,प्रास्ताविक संदीप चाटे,स्वागत परिचय शरद पवार व आभार विनायक इंगळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

About The Author

error: Content is protected !!