घारोळा येथे पोखरा अंतर्गत एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन शेतीशाळा संपन्न

घारोळा येथे पोखरा अंतर्गत एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन शेतीशाळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : पोखरा योजने अंतर्गत घारोळा तालुका चाकूर येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत हारभरा या पिकावर शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेतीशाळा मध्ये माहिती सांगताना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा चे शेतीशाळा प्रशिक्षक मा.श्री.शरद बी हुडे यांनी हरभऱ्यावरील घाटे आळी चे व्यवस्थित एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. आळीचा प्रादुर्भाव ओळखून किंवा नुकसान पातळी ओलांडल्यास त्यावर ती वेळीच फवारणी करणे गरजेचे आहे. व किडींना नियंत्रणात आणण्यासाठी किडींची ओळख अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये अंडी, आळी, कोष, पतंग या अवस्थेमध्ये आपल्याला त्यांचे चक्र दिसून येते . म्हणून हरभरा या पिकाचे यामुळे किड व रोग यामुळे आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकाचे औषधे वापरणे गरजेचे आहे. यामध्ये इमामेक्टीन बेंजोएट किंवा क्विनोलफोस 20 टक्के ac किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 2.5 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के Ac 3 मीली फवारावे. गावातील प्रगतशील शेतकरी श्री.अशोकराव चिंते. रामराव जाधव, हानमंतराव मोहीते,गोविंद सूर्यवंशी,डीगांबर जाधव,लक्ष्मण सुर्यवंशी,नारायण सूर्यवंशी,उपसरपंच रज्जाकभै शेख, सदस्य आत्माराम शिंदे,सरपंच सौ.सत्यभामाबाई चिंते,सदस्य सौ.जयाबाई जाधव, शकुंतला चिंते,सत्यभामा माळी,शेषाबाई माळी,वनाबाई सुर्यवंशी,लताबाई जाधव, कृषी ताई शेख हजरतबी आदी गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!