महात्मा फुले महाविद्यालयात ‘आजादी की मशाल’ रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत

महात्मा फुले महाविद्यालयात 'आजादी की मशाल' रॅलीचे पुष्पवृष्टीने स्वागत

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी की मशाल’ या रॅलीचे आयोजन आले असून सदर रॅलीचे व त्यातील सहभागी मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या वतीने पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले. महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारासमोरच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या सर्व सहकारी प्राध्यापकांना घेऊन मशाल यात्रेचे प्रमुख प्रा. डॉ. गौरव जवळेकर, डॉ. साईनाथ उमाटे, डॉ. सुदर्शन पेडगे , डॉ. के. डी. सावंत, महात्मा फुले महाविद्यालयातील आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. बब्रुवान मोरे यांच्यासह रॅलीतील आदित्य गायकवाड, राम बिरादार, अंकुश बिरादार, भगवान हल्लाळे, धोंडीराम काळगे, रमेश वाघमारे, बालाजी टेकाळे, नागेश सोनटक्के, सूर्यकांत मुळे, गोविंद तेलंगे या सहभागी स्वयंसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर ही मशाल रॅली महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आणण्यात आली. तिथे भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!