फुले महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या ‘कॉपी मुक्त’ हिवाळी परीक्षा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी- २०२३ च्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व ‘कॉपीमुक्त’ वातावरणात सुरू आहेत. महात्मा फुले महाविद्यालय हे अहमदपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असून या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असून या अभ्यास केंद्रामध्ये बी. ए. , योगाभ्यास, पत्रकारिता पदवी कोर्स, बाल संगोपन पदविका, एम. ए. मराठी, एम.ए. हिंदी हे अभ्यासक्रम चालतात. या अभ्यास केंद्रावर सध्या चाकूर तालुक्यातील व अहमदपूर तालुक्यातील , लोकमान्य महाविद्यालय,चाकूर, संजीवनी महाविद्यालय, चापोली, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय, हाडोळती, महात्मा फुले महाविद्यालय, किनगाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय, सांगवी, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथील अभ्यास केंद्राद्वारे चालणाऱ्या पदव्युत्तर सर्व वर्गाच्या सत्र परीक्षा आणि पदवी बी.ए., बी. कॉम बॅकलॉग वर्गाच्या परीक्षा घेण्यासाठी या अभ्यास केंद्राची निवड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी केली असून या महाविद्यालयात कॉपीमुक्त वातावरणात आणि सीसीटीव्ही च्या निगराणीत परीक्षा शांततेत व सुरळीतपणे सुरू आहेत. हिवाळी- २०२३ परीक्षा यशस्वी करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्र नांदेड चे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. बी .के. मोहन, सहाय्यक कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार आणि त्यांचे कर्मचारी यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉ. अनिल मुंढे, बहिस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा. भगवान साळवे आणि केंद्र सहाय्यक प्रा. डॉ. संतोष पाटील, चंद्रकांत शिंपी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी काम पाहत आहेत.
