महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थोर स्वातंत्र्य सेनानी तथा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागातील प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे हे होते तर, कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हडोळती चे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद शिळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ गोविंद शिळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.सतीश ससाणे, डॉ . संतोष पाटील, प्रा.प्रकाश गायकवाड, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!