महात्मा फुले महाविद्यालयात सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस जयंती निमित्त पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले व मराठीचे प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी महाविद्यालयातील डॉ.प्रशांत बिरादार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,. नंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर, आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मांडले. यावेळी डॉ.सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, प्रो. डॉ. नागराज मुळे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ.डी.एन. माने ,डॉ. एस. एच. गर्जे, डॉ . पी.पी. चौकटे, प्रा.ए.सी. आकडे, डॉ. संतोष पाटील, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!