यशवंत विद्यालयात नेतजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती विविध उपक्रम करून साजरी करण्यात आली. प्रारंभी प्राचार्य व्ही.व्ही.गंपले यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून परवेक्षक उमाकांत नरडेले, इंग्रजी विभागाचे प्रमुख श्री अरुण मोरे, सहशिक्षक श्री शिवाजी सूर्यवंशी, सौ नागमणी हाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री अरुण मोरे यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेता सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही व्ही गंपल्ले यांनी केले. यावेळी विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
