मातृभूमी महाविद्यालयात विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन व भारतमातेचे पूजन

मातृभूमी महाविद्यालयात विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन व भारतमातेचे पूजन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मातृभूमी महाविद्यालयात कोमल घुले बी सी स TY ची विद्यार्थिनी व सतीश पाटील RSS धर्म जागरण प्रमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले . त्याच बरोबर भारतमातेचे पूजन सर्वांनी मिळून केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी प्रतिष्ठान शि प्र मं चे अध्यक्ष सतीश रे. उस्तुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून, संजय राठोड जिल्हाअध्यक्ष मनसे , ओंकार कुलकर्णी , संतोष जिरोबे , सुधीर पाटील , कल्याण धनुरे हे उपस्थित होते.

या वेळी संजय राठोड विद्यार्थीना संबोधित करताना म्हणाले 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण असून ही मोठ्या उत्साहाने साजरे करणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमातून स्वतःच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळवले आहे. ते जपणे, अबाधित ठेवणे. हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. या देशाच्या मातीतून उगवलेल्या अन्नधान्यावर साधन संपत्तीवर आपण जगतो आहोत, त्या भारत मातेच्या उपकाराची परतफेड प्रत्येकाने केली पाहिजे. आजची तरुण पिढी ही स्मार्ट आहे, पण त्यांच्यात संस्काराची कमी दिसून येते. ती कमी पूर्ण करण्याचे काम हे मातृभूमी महाविद्यालय करत असून ही शिक्षण संस्था नसून संस्कार केंद्र आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य उषा कुलकर्णी , प्रा. रणजित मोरे , प्रा. धोंडीराम जोशी , प्रा उस्ताद , प्रा. रेखा रणक्षेत्रे , आकाश राठोड , हिप्पळगावकर अनवेश , आशा पवार , प्रा. अश्विनी देशमुख , ओंकारे जगदिशा , कांचन वडपत्रे , उषा सताळकर, विजयकुमार पाटील , नंदकिशोर बयास , उस्ताद एम एस , दयानंद टाके , विवेक देवर्षे ,यांच्यासह संस्कार भारतीचे डॉ संजय कुलकर्णी, गौरव जेवलीकर,डॉ रवी पाटील,मुकेश कुलकर्णी,प्रदीप पत्तेवर ,बालाजी मुर्के ,सिद्धेश्वर पैके ,संध्या पत्तेवार ,पूजा मूर्के तसेच मातृभूमी महाविद्यालयाच्या BCA, BCS , मातृभूमी नर्सिंग स्कूल ANM , कस्तुराबाई नर्सिंग स्कूल GNM व सी-डॅक कम्प्युटर्स MS CIT, TALLY, DTP चे सर्व विध्यार्थी उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!