सी ए ऋषिकेश बाहेती यांचा यशवंत विद्यालयात सत्कार संपन्न

सी ए ऋषिकेश बाहेती यांचा यशवंत विद्यालयात सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाचा माजी विद्यार्थी ऋषिकेश पुरुषोत्तम बाहेती यांने सी ए च्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्याने त्याचा यशवंत विद्यालयांमध्ये प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री ऋषिकेश बाहेती म्हणाला की, मी आवरेज विद्यार्थी होतो पण जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि निरंतर अभ्यासाच्या जोरावर सी ए ची पदवी हस्तगत केली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे व्हायचे असेल तर आई-वडील, गुरूंचा आदर सन्मान करा. मित्र चांगले ठेवा, व्यसनापासून दूर राहा, मोबाईलचा वापर कमी करा, आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा असे जाहीर आवाहन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी केला. यावेळी पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, एन सी सी ऑफिसर अशोक पेदेवाड, अरुण मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सहशिक्षक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार शरद करकनाळे यांनी मांनले.

About The Author

error: Content is protected !!