शिवलिंग गोविंदराव लांडगे गुरुजी यांचे दुःखद निधन
अहमदपूर : दि.27.01.23 बनवस ता. पालम येथील शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवलिंग गोविंदराव लांडगे गुरुजी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी दिनांक 26 रोजी गुरुवारी रात्री बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांचे पश्यात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवारासून जि. प. शा बनवस चे सहशिक्षक महादेव लांडगे आणि यशवंत विद्यालय, अहमदपूर येथील सहशिक्षक सचिन लांडगे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर दिनांक 27रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी बनवस येथील शेतामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
