शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा

शासकीय ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील जिल्हा परिषद च्या मैदानामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक सोहळ्याचे ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे सह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शहीद माता कौशल्य लहाने यांचा उपविभागीय अधिकारी प्रवीण पुढारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मतदार दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भाषण रांगोळ्या आणि चित्रकला स्पर्धेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने तंबाखूमुक्तीची शपथ सहशिक्षक राम तत्तापुरे यांनी दिली. यावेळी शहरातील यशवंत विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, विमलाबाई देशमुख विद्यालय ,नूतन मराठी विद्यालय, कमला नेहरू विद्यालया च्या शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरी करून प्रेक्षकांची मन जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे यांनी तर आभार नायब तहसीलदार एम एस पेदेवाड यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!