यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संस्काराची शपथ टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगलीकर यांनी दिली यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी आणि दहावीतील टॉप टेन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृतीची नाणी पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. सोहळ्याचाअध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव शिक्षण वर्षे डी बी.लोहारे गुरुजी यांनी केला. यावेळी उपप्राचार्य गिरिधर घोरबांड, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, राम तत्तापुरे, शिवाजीराव गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.व्ही. पाटील यांनी तर आभार के डी बिराजदार यांनी मांनले.

About The Author

error: Content is protected !!