महाविद्यालयाच्या यशात माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा – प्राचार्य वसंत बिरादार पाटील

महाविद्यालयाच्या यशात माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा - प्राचार्य वसंत बिरादार पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची ओळख विविध क्षेत्रात निर्माण केली असून महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रांमध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रसेवा करीत आहेत.महाविद्यालयाच्या यशात माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे ,असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, माझी विद्यार्थी व पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, विचारमंचावर माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा यशवंत विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका तथा माजी विद्यार्थीनी वर्षा लगडे माळी, सचिव राहुल गायकवाड, माजी विद्यार्थी संघटनेच्या सल्लागार महादाताई चौकटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक प्रो.डॉ. अनिल मुंढे, पालक प्रतिनिधी गणेश मामा पांचाळ, सौ. पुष्पा भराडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जसे आपण माता, पिता, समाज यांचे ऋणी लागतो तसेच आपण महाविद्यालयाचे ऋणी असतो, हे लक्षात ठेवून जो विद्यार्थी जीवन जगतो, तो आपल्या जीवनामध्ये निश्चितच यशस्वी होतो. असेही ते म्हणाले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांचे स्वागत केले. याप्रसंगी माझे विद्यार्थी सुरज पवार, राहुल गायकवाड, अनिल पोतवळे, आशा भराडिया, नागेन्द्र काकडे, विष्णु पांचाळ, गणेश सोनवणे, महादा चौकटे यांच्यासह पालक प्रतिनिधी गणेश मामा पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर, माजी विद्यार्थी संघटनेची घोषणा उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केली. तसेच, सूत्रसंचलन डॉ.मारोती कसाब यांनी व आभार सह संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व आजी – माजी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!