बंसल क्लासेस उदगीर आयोजित रंगला खेळ पैठणीचा
उदगीर (एल.पी.उगीले) : बंसल क्लासेस आणि राजस्थानी मल्टी स्टेट को-ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेड आयोजित हळदी कुंकम निमित्त होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम बंसल क्लासेस, उदगीर येथे भव्य दिव्य रुपाने पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांनी आपला सहभाग नोंदविला.
हळदीकुंकुम कार्यक्रमानिमित्त परदेशी अॅडव्हटायझर औरंगाबाद यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लाखो वहिनींचा आवडता असणारा कार्यक्रम सिनेअभिनेता सुशांत घाटसावळीकर यांचा सुशांत भाऊजींचा होममिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खुप छान रंगला. परदेशी अॕडव्हरटाइझचे अभिषेक परदेशी, लावण्यवती सपना पुणेकर, वेस्टर्न क्विन ज्योती बार्शीकर , सहकलाकार प्रदिप गवांडे, आकाश पवार , सिफा पटेल, संपदा भिसे, जाबीर सय्यद यांनी सुंदर साथ दिली.
कार्यक्रमातील मानाच्या पैठणीच्या विजेत्या वहिनी प्रथम पारितोषिक सौ. अश्विनी मुळे – मानाची पैठणी, व्दितीय पारितोषिक सौ. सारिका चन्नावार – मानाची पैठणी, तृतीय पारितोषिक सौ. अश्विनी गायकवाड – मानाची पैठणी, उत्तेजनार्थ पारितोषिक सौ. भाग्यश्री बिराजदार, सौ. शितल आळंदे, सौ. नंदिनी कपाळे विजेता वहीनीनां पारितोषिक देण्यात आले.
यावेळी अभिजीत औटे, उदगीर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग, दिपाली औटे महिला शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंसल क्लासेसचे शाखा प्रमुख रवि गुदळे, मारोती हिबाने, माधव कलवले, श्यामसुंदर घुगे, मुकेश निरुणे, अंकिता मॅडम, निकिता मॅडम, कोमल मॅडम, दीक्षा मॅडम, ऐश्वर्या मॅडम, वर्षा मॅडम, प्रज्ञा मॅडम, आरती मँडम, चांदणी मँडम आदिनी परिश्रम घेतले.
