जनहितासाठी सदैव प्रेमाचा झरा !! संजूभाऊ यांच्या सारखाच लोकनेता खरा !!

जनहितासाठी सदैव प्रेमाचा झरा !! संजूभाऊ यांच्या सारखाच लोकनेता खरा !!

लातूर (एल.पी.उगीले) : सर्वसामान्य जनतेच्या मताधिक्यावर राजकारणात यशस्वी झालेली कित्येक राजकारणी लोक, अर्थात लोकप्रतिनिधी, विजयी झाल्यानंतर ज्या जनतेमुळे आपण पद भोगतोय. हे विसरून आपल्याच ऐशोआरामात मशगुल राहतात. मात्र उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. तथा माजी गृहराज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे हे या गोष्टीला अपवाद आहेत.

त्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य माणसाबद्दल प्रेम आणि जिव्हाळा मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
त्यासाठीच राज्यमंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रात फिरून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी पायात घुंगरू बांधल्यासारखे सतत फिरत राहत होते. शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. हा त्यांचा अट्टाहास असायचा, हे सर्व करत असताना, “घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी” या काव्यपंक्तीप्रमाणे महाराष्ट्रभर फिरताना देखील ते सतत उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करतात. जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला विजयी केले आहे. त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. विकासाचे दिलेले अभिवचन त्यांनी कधीच पूर्ण केले आहेत. राजकारण करत असताना सर्वसामान्यपणे राजकारणी माणूस आपल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना झुकते माप देतो. मात्र उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. संजयभाऊ बनसोडे हे राजकीय हेवेदावे आणि मतभेद बाजूला ठेवून, आपण सर्वच जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे राजकीय विचारधारा फक्त निवडणुकीच्या काळात उपयोगात आणायची, इतर वेळेस आपण या सर्व जनतेचे प्रतिनिधी आहोत. या जनतेचे हित आपण पाहिले पाहिजे. अशा उदात्त्य भावनेने झपाटल्यागत ते काम करत आहेत.

“माणूस जन्माला येतो, पण माणुसकी जन्माला घालावी लागते”असे म्हणतात. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आ. संजय भाऊ बनसोडे आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ऍड. शिवानंद हैबतपुरे यांचा अपघात झाल्याचे समजताच तात्काळ आ. संजयभाऊ बनसोडे यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या नातलगांना धीर दिला, तसेच वैद्यकीय सेवेच्या संदर्भात त्या ठिकाणच्या डॉक्टरांना योग्य सेवा द्या, असे कळवले. हैबतपुर यांच्या परिवाराला भेट देताना, “काळजी करू नका, मी आहे ना” असा धीर दिला. त्यांचे हे वाक्य त्या ठिकाणी उपस्थित लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. राजकीय हवेदावे बाजूला ठेवून, हा माणूस इतक्या तत्परतेने धावून येतो. सर्वांना सहकार्य करण्याचे सांगतो. हे चित्र पाहून आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या मनाचा मोठेपणा उपस्थितांना स्पष्टपणे जाणवत होता. तशा प्रतिक्रिया देखील उपस्थित हैबतपुरे परिवारातील आणि स्नेही जन यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होत्या.

जनहितासाठी सदैव प्रेमाचा झरा !! संजूभाऊ यांच्या सारखाच लोकनेता खरा !!

About The Author

error: Content is protected !!