मुस्लिम मतदारांची वाढवणा पाटी येथे बैठक संपन्न!

मुस्लिम मतदारांची वाढवणा पाटी येथे बैठक संपन्न!

वाढवणा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनल बनवल्याबद्दल मुस्लिम समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मुस्लिम समाजाच्या मतांचा वापर केवळ नेते मंडळी स्वतःसाठी करत आहेत, कर्त्यांची निवडणूक आल्यास मुस्लिम समाजाला वगळून ठराविक लोकांना संधी दिली जात आहे अशी खंत ही मुस्लिम नेत्यांनी व्यक्त केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायत मतदार, सहकारी संस्था मतदार, हमाल मापाडी मतदार, व व्यापारी मतदाराची संयुक्त बैठक वाढवणा पाटी तालुका उदगीर येथे संपन्न झाली.यावेळी निडेबन चे उपसरपंच फैयाज आतार, वाढवणा खुर्द चे ग्राम पंचायत चे सदस्य रऊफ शेख, लोणीचे ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख, वाढवण्याचे ग्रामपंचायत सदस्य अमजद पठाण, सदस्य सलीम तोंडारे, आदींनी आपले मनोगत व्यक्त करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक उमेदवारी न दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत पुढील बैठक दि.26-04-2023 रोजी सकाळी ठीक 11=00 वाजता, निडेबनचे उपसरपंच फय्याज आत्तार यांच्या येथील निवासस्थानी घेण्याचे एकमुखाने ठरले.

दि.26-04-2023 रोजी निडेबन येथे होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मुस्लिम समाजाची मते ग्रामपंचायत मतदारसंघ 47, सहकारी संस्था मतदारसंघ 39, हमाल मापाडी मतदारसंघ 49, व व्यापारी मतदारसंघात 29 अशी मतदारसंघ निहाय मतदारसंख्या असून, या सर्व मतदारांना निडेबन येथे होणाऱ्या बैठकीत एकत्रित बोलावून सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे.

यावेळी अन्वर हवलदार, महेबुब ठाणे, गुडसूरचे रौफ थोडगे, किनीचे शेख निजाम, लोणीचे समद मौलाना, शेख इकबाल, गुडसुडचे सय्यद चमन, रावणगावचे फकीर पाशा, फेरोज शेख, रहीम कासार, असलम पठाण, शेख मेहबूब (राजू ), आदीसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, हमाल मापारी सदस्य, व व्यापारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author