हजरत टिपुसुलतान रह यांच्या शहीद दिनी ध्वजारोहन

हजरत टिपुसुलतान रह यांच्या शहीद दिनी ध्वजारोहन

अहमदपूर (गोविंद काळे) : हजरत टिपुसुलतान रह. यांच्या ४ मे रोजी शहिद दिनी टिपु सुलतान चौक येथे पत्रकार संघाचे अध्यक्ष बासिदखान पठाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून ध्वजारोहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक युवक नेते तथा मुस्लिम विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष शेख अय्याज, संस्थापक संघटक अफरोज पठाण, संपादक असलम शेख, सचिव साबेर शेख, तालुकाध्यक्ष सय्यद माजीद, शहराध्यक्ष शेख हाजी, सामाजीक कार्यकर्ते गणेश मदणे, शेख असद, उमर पठाण, यादींची उपस्थिती होती तर कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले.
४ मे भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी व प्रथम मिसाइल मँन ह.टिपू सुलतान रहे. यांचा हुतात्मा (शहीद दिन) दिवस इंग्रजांना शेवट पर्यंत प्रखर पणे लढा देनाता ४ मे १७९९ या रोजी हातात तलवार घेऊनच इंग्रजांशी लढा देत असताना त्यांना विर गती मिळाली व ते शहीद झाले. या शहिद महापुरूषांची आठवण रहावी व त्यांनी दिलेल्या लढ्याची प्रेरणा सदैव युवकांना मिळावी म्हणून त्यांच्या शहीद दिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले.

About The Author