अहमदपुर “अशोकनगर ” मधील अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी
अहमदपुर (गोविंद काळे) : संत ज्ञानेश्वर शाळेच्या समोरिल भागातील “अशोकनगर” येथील सर्वे न.80/1 फ्लॉट नं.23 चे मालक सौ.सुलोचनाबाई पांचाळ यांनी 30 फुटाच्या रोडवर 07 फुटांचे अतिक्रमण केले आहे. त्याचे पाहुन काँलनीतील बेले व काबंळे हे अतिक्रमण करत आहेत.तरी नगर परिषद अहमदपुर यांनी त्वरित अतिक्रमण हटवावे अशा मागणीचे निवेदन” अशोकनगर”येथील रहिवाशांनी मुख्याधिकारी न.प.अहमदपुर यांना दिले आहे तरी लोकाना ये-जा करण्यास व वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. यापुर्वी दि.08/02/2016 रोजी पण निवेदन दिले होते. त्यावेळी न.प.ने स्थळ -पाहणी केली होती पंरतु कुठलिही कार्यवाही झाली नाही. या निवेदनावर काँलनीतील बालाजी पारेकर,वाघमारे वैजैनाथ,वाघमारे गणेश, गोन्टे राजकुमार, सोमवंशी राजेंद्र आदीच्या सह्या आहेत.