दलीत वस्तीत अकरा बोअरसाठी शासनाकडून 13.60 लाख रूपये मंजूर..!

दलीत वस्तीत अकरा बोअरसाठी शासनाकडून 13.60 लाख रूपये मंजूर..!

डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्यास यश…!!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील वेगवेगळ्या दलित वस्तीमध्ये शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून अकरा ठिकाणी बोअर घेण्यासाठी तेरा लाख साठ हजार एवढा निधी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंजूर करून आणला आहे.तसे पत्र नूकतेच नगरपरिषदेला प्राप्त झाले असून निविदा प्रक्रिया होवून शहरात नवीन 11 बोअर घेण्यात येणार आहेत.

नगर पालिकेने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत बोअर घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता मात्र हा प्रस्ताव प्रलंबित होता.दरम्यान येथील युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी या बाबत राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून दलित वस्तीत बोअरचे नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणले.त्या नुसार शासनाने जिल्हाधिकारी लातूर यांना पत्र देवून रितसर प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना केल्या त्यानुसार जिल्हाधिकारी लातूर यांनी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन निधीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

या संबंधाने वेळो वेळी पाणी पुरवठा मंत्री,पाणीपुरवठा राज्यमंत्री यांच्याकडे या बाबत लक्ष वेधून अहमदपूर नगर परिषदेकडे बोअर घेण्यासाठी निधी मंजूर करून आणला आहे.नूकतेच राज्यशासनाने या बाबत आदेश आले असून पालिकेनेही निविदा प्रक्रिया सूध्दा केली असून लवकरच शहरातील बौध्द नगर, सिध्दार्थ नगर, हनुमान टेकडी, शिवाजीनगर, गायकवाड काॅलनी, दर्गपूरा,भारत काॅलनी, इंदीरानगर, साठेनगर खाटिकगल्ली, पंचशिल नगर येथे इत्यादी दलीत वस्तीत बोअर घेत ए जाणार आहेत.

एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेल्या वर्षभरापासून सातत्याने शासनाकडे पाठपूरावा करून निधी अभावी प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यास यश मिळाले असून सदरील बोअरमूळे शहरातील दलीत वस्तीतील पाण्याची टंचाई कांही प्रमाणात तरी सुटण्यास मदत झाली आहे असे मत या प्रकरणाचा पाठपूरावा करणारे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त करून शहराच्या दलीत वस्तीत पाणी पुरवठ्यासाठी निधी मंजूर केल्या बद्दल पाणीपुरवठा राज्यमंत्री संजयजी बनसोडे,जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हाप्रशासन अधिकारी सतिश शिवणे, मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, अभियंता गणेश पुरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author