अहमदपूरात रक्तदान शिबीरात 51 बाटल्या रक्तदान…!

अहमदपूरात रक्तदान शिबीरात 51 बाटल्या रक्तदान...!

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या रक्तदानाची मोठी गरज लक्षात घेवून येथील युवक मित्रमंडळींनी एकत्र करून आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात 51 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजीत केलेल्या या शिबीराची सूरूवात सकाळी 9 वाजता झाली.त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या मान्यवरांनी शिबीरास भेटी दिल्या.यात प्रामुख्याने पोलीस निरीक्षक लाकाळ साहेब,युवनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी आदींचा सहभाग होता. या वेळेस शिबीर संयोजक नागेश हेंगणे, दयानंद रेड्डी, अमोल सज्जनशेट्टी, निलेश करडखेले, विलास महाजन, प्रफुल्ल कल्याणी आदींनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!