अहमदपूरात केएसके कन्स्ट्रक्शनच्या वतीने कामगारांना धान्य वाटप

अहमदपूरात केएसके कन्स्ट्रक्शनच्या वतीने कामगारांना धान्य वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील केएसके कस्न्ट्रक्शन अर्थात किरण सखाराम कांबळे यांच्या वतीने लॉकडाऊनमुळे काम मिळत नसलेल्या कामगारांना धान्य वाटप करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील केएसके कस्न्ट्रक्शन प्रो.प्रा. किरण सखाराम कांबळे यांच्या वतीने पोलिस आंमलदार बाळासाहेब साळवे यांच्या हस्ते 50 कामगारांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर प्रा. बालाजी कारामुंगीकर, किरण कांबळे, रवि कांबळे, बालाजी गायकवाड, महेश कांबळे आदींची उपस्थिती होती. कोरोना सारख्या महामारिच्या काळामध्ये बर्‍याच दिवसापासून लाकडाऊनमुळे कामगारांना, मजुरांना काम मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामाजिक बांधिलकी जपत किरण कांबळे यांनी 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधुन कामगारांना, मजुरांना धान्य वाटप करण्याचा निर्धार करुन आज दि. 2 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता होळकर हास्पीटल समोर केएसके कन्स्ट्रक्शनच्या ऑफिस समोर धान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमोल जंगले, नितिन पवार, फारुख शेख, सागर जंगले, राजु शिकारे, गवळे शरद, गायकवाड जनार्धन, गायकवाड दगडु, अमोल ढवळे, राजु ढवळे, रवि गायकवाड, दिपक गायकवाड, बाळु मादळे, खय्युम शेख यासह जवळपास 50 जनांना गहु, तांदुळ धान्य वाटप करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळत सदरील कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण कांबळे, रवि कांबळे, बालाजी गायकवाड, महेश कांबळे यासह केएसके कस्ट्रक्शन येथील कामगार यांनी परिश्रम घेतलेे.सामाजिक बांधिलकी जपत धान्य वाटप केल्यामुळे किरण कांबळे यांचे कौतुक होत आहे.

About The Author