विज पडुन बैल दगावला
हलगरा (राजेवाडी) शिवारात दुपारी २:३५ वाजता घडली घटना
औराद शहाजानी (भगवान जाधव) : निलंगा तालुक्यातील हलगरा परीसरातील राजेवाडी शिवारातील सर्वे नंबर १६ मध्ये दुपारी लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर अचानक अवकाळी पाऊस झाल्याने त्यात विज पडुन एक बैल दगावला. औराद येथे 3 मिली पावसाची नोंद करण्यात आली.
हलगरा शिवारातील राजेवाडी येथील शेतकरी मोहन निवृत्ती गायकवाड यांच्या सर्वे नंबर सोळा या शेतीमध्ये दुपारी अचानक पाऊस आल्याने व त्यामध्ये वीज पडल्याने लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने एक बैल दगावला त्यामुळे या शेतकऱ्याचे अंदाजे ६० हजार किंमतीचे बैल दगावल्याने आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे व पुढील मशागतीसाठी या शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे.
ही घटना कळताच हलगरा येथील तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तहसील कार्यालयास कळवले आहे व औराद शहाजानी चे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे हलगरा गावाचाही अधिकृत सेवा देण्याचा अधिकार असल्याने त्यांचा पोस्टमार्टेम चा अहवाल घेणे गरजेचं आसल्यामुळे त्यांना संबंधित शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा मुक्काम हा दुसऱ्यागावी असल्यामुळे ते आज पंचनामा करू शकत नाही उद्या सकाळी करुन देतो बोलले असे संबंधित शेतकऱ्याने सांगितले.