इंजि.अनिलकुमार ब. गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती

इंजि.अनिलकुमार ब. गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती

अमित तिकटे

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक महत्वाची पदावर काम केलेले आणि सध्या एम एस आर डी सी च्या हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे मुख्य अभियंता तथा सह व्यावस्थापकिय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे सचिव बांधकामे चा अतिरिक्त चार्ज सांभालत असलेले उत्कृष्ट अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन वेळा गौरवित केलेले इंजि. अनिलकुमार बळिराम गायकवाड यांची आज सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय,मुंबई च्या सचिव ( बांधकामे) या पदावर महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.
इंजि. अनिलकुमार गायकवाड यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मुंबई मधले उड्डाण पुल,सी लिंक, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, वैतरणा नदिवरील सर्वात उच लोखंडी पूल, दिल्ली येथील सुंदर असे महाराष्ट्र सदन ची वास्तू,मुंबई हाईकोर्ट च्या इमारतीचं आधुनिक पद्धतीच जतन, आणि सध्या सुरू असलेलं महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री चा महत्वकांक्षी प्रकल्प समृध्दी महामार्ग असे अनेक प्रकल्प यशस्वी पूर्ण केलेले आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!